कार्ला फाट्याजवळ झालेल्या अपघातामुळे जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
लोणावळा, दि. 08 - कार्ला फाट्याजवळ झालेल्या अपघातामुळे जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने हा अपघात झाला. हा अपघात सकाळी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातामुळे उलटलेला ट्रक व पाईप हे रस्त्यावरच पसरले असल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. या अपघातात जिवितहानी झालेली नाही.
अपघातग्रस्त ट्रक मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात होता. चालकाचा ताबा सुटल्याने एमटीडीसी ते कार्ला फाटा दरम्यान ट्रक रस्त्यामध्येच उलटला. यावेळी ट्रकमधील सर्व लोखंडी पाईप रस्त्यावर सर्वत्र पसरले. याच दरम्यान पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक हा विरुध्द बाजुला रस्त्याच्या खाली उतरला आहे. सध्या पुण्याकडे जाणारी वाहतुक एकेरी मार्गाने वळविण्यात आली आहे. या अपघातामुळे पुणे व मुंबई या दोन्ही मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती . घटना घडल्यानंतर आठ वाजता क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त ट्रक व लोखंडी पाईप बाजुला सारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक संथ गतीने सुरु होती.