Breaking News

आसाममध्ये पुरामुळे एक लाखांपेक्षा अधिक जणांचे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली, दि. 07 - आसाममधील पुरास्थितीमुळे लखीमपुर आणि करीमगंज जिल्ह्यातील एक लाखांपेक्षा अधिक जणांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममधील 140 गावे पाण्याखाली बुडाली आहेत. तसेच येथील 4 चार नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. तर, झारखंडमध्ये वीज पडल्यामुळे चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आसाममध्ये पुरस्थिती निर्माण झाली असली तर अनेक राज्यांमध्ये अद्याप पावसाचे आगमन झालेले नाही. पंजाबमध्ये 43 डिग्री सेल्सियस, चंदीगडमध्ये 41.5 डिग्री सेल्सियस, हरियाणामध्ये 42.6 डिग्री सेल्सियस, राजस्थानमध्ये 43.5 डिग्री सेल्सियस, उत्तर प्रदेशमध्ये 35.3 डिग्री सेल्सियस आणि ओरिसामध्ये 40 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. बिहारमध्येही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडते आहे.