Breaking News

दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार व बीएसएफला फटकारले

नवी दिल्ली, दि. 22 -: सुरक्षा दलातील कर्मचारी असमाधानी राहिल्यास ते मनापासून काम करू शकणार नाहीत, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार  व सीमा सुरक्षा दलाला फटकारले. न्या. संजीव सचदेव व न्या. ए.के. चावला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
पत्नी गर्भवती असल्याने माझी बदली करू नये, अशी मागणी हवालदार भूदेव सिंग यांनी याचिका केली होती. त्यावर संबंधित हवालदारासंदर्भात सहानुभूतीने विचार  करावा. त्यांच्या पत्नीला बाळ होत नाही तोपर्यंत सिंग यांची दिल्लीहून शिलाँगला बदली केली जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी 12 जुलै  रोजी होणार आहे.