Breaking News

मराठवाडयातील उमरगा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

औरंगाबाद, दि. 08 - आज मराठवाडयात पावसाने दमदार हजेरी लावली असून सर्वदूरपर्यंत पाऊस पडला सकाळ पासून ढगाळ हवामान होते. दुपारी विजेच्या  कडकडटासह पासवसाची सुरूवात झाली. औरंगाबाद शहर आणि मराठवाडाभर जोराचा पाऊस पडला. सगळयात जास्त पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा  तालुक्यात पडला मान्सूनच्या सुरूवातीलाच अतिवृष्टी झाली. दोन तासात 102 मिमी पाऊसाची नोंद उमरगा तालुक्यात झाली आहे.