Breaking News

लाहोर न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा दयेचा अर्ज फेटाळण्यासाठी याचिका दाखल

लाहोर, दि. 01 - पाकिस्तानच्या तुरूंगात कैद असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचा दयेचा अर्ज फेटाळण्यासाठी दोन याचिका  पाकिस्तानातील लोहार न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. पहिली याचिका पाकिस्तानी नागरिक महमूद नक्वी यांनी दाखल केली असून जाधव हे भारतीय  गुप्तहेर असून दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे जाधव यांनी मान्य केले आहे, असे या याचिकेत नमूद केले आहे. 
जाधव यांच्या शिक्षेत सूट देण्याबाबतचा अधिकार दहशतवादी कारवायांमध्ये ठार झालेल्या कुंटुंबियांना दिला पाहिजे. राष्ट्राध्यक्ष, जनरल बाजवा किंवा अन्य कोणत्याही  व्यक्तीला हा अधिकार देता कामा नये, असे दाखल करण्यात आलेल्या दुस-या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.  भारतीय गुप्तहेर असल्याच्या आरोपाखाली  पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. जाधव यांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा रॉने  केला आहे.