Breaking News

सीरियात झालेल्या रासायनिक हल्ल्यात सरीन वायूचा वापर ‘ओपीसीडब्ल्यु’ गौप्यस्फोट

वॉशिंग्टन, दि. 01 - सीरियातील खान शेखुन शहरात 4 एप्रिल रोजी झालेल्या रासायनिक हल्ल्यात सरीन वायूचा वापर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संयुक्त  राष्ट्रातील रासायनिक शस्त्रे प्रतिबंधक संघटना (ओपीसीडब्ल्यु) या संस्थेने केला. ओपीसीडब्ल्यु या संस्थेने एक अहवाल तयार केला होता. त्यात हा गौप्यस्फोट  करण्यात आला आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्र आणि ओपीसीडब्ल्यु संयुक्तरित्या चर्चा करणार आहेत.
तसेच अहवालातील काही भाग एएफपीकडे असून त्यांच्या मते, येथील नागरिक मोठ्या प्रमाणावर सरीन सारख्या पदार्थांच्या संपर्कात आल्याने त्यांचा मृत्यू झाला  आहे. या हल्ल्यात 87 जणांचा मृत्यू झाला असून त्यात बालकांचाही समावेश आहे.अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटेन यांनी राष्ट्रध्यक्ष बशर अल असद यांच्या लष्करास  दोषी ठरविले आहे.