Breaking News

कतलीसाठी बांधून ठेवण्यात आलेल्या गायी पोलिसांनी घेतल्या ताब्यात; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

संगमनेर, दि. 10 -  शहरातील भारत नगर येथील पटांगणात कत्तलीसाठी भाकड गायी बांधण्यात आल्याची माहिती पो. नि. गोविंद ओमासे यांना मिळाली. या  माहितीवरून त्यांनी काल शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता छापा टाकून 30 हजार रूपये किंमतीच्या 5 जीवंत गायी ताब्यात घेतल्या. या संदर्भात अज्ञात  इसमावरपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भारत नगर येथील मोकळ्या पंटगणात कत्तलीसाठी काही भाकड गायी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती पो. नि. गोविंद ओमासे यांना मिळाली. या  माहितीच्या आधारे त्यांनी काल शुक्रवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास या भागात आपल्या सहकार्‍यांसमवेत छापा टाकला. येथे 30 हजार रूपये किंमतीच्या 5  जिवंत गायी आढळून आल्या. त्या गायी त्यांनी ताब्यात घेवून कर्‍हे घाटातील जिवदया ट्रस्टच्या पांजरपोळमध्ये दाखल केल्या. या संदर्भात पो. कॉ. गोरक्ष शिवाजी  शेरकर यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गु. र. नं. 72/2016  महाराष्ट्र प्राणी गोरक्षण कायदा कलम 5 अ, (1) 9 प्रमाणे गुन्हा दाखल  केला आहे.
राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही शहरात गोवंश मांस मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. अनेकदा राज्यातील सर्वात मोठ्या कारवाया शहरात होवूनही हा  गोरखधंदा अद्यापही सुरू आहे. तालुक्यातील कोकणगावातही दोन दिवसापुर्वी गोवंश मांसचा टॅम्पो पकडण्यात आला होता. हि कारवाई होत नाही, तोच कत्तलीसाठी  शहरातील अनेक भागात असे भाकड जनावरे आढळून येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलीस प्रशासनही या घटनांवर बारीक लक्ष ठेवून असून कारवाईसाठी  तत्पर असतात. कालच्या घटनेने गोवंश मांस विक्री करणारांमध्ये खळबळ उडाली आहे.