Breaking News

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय

बर्मिंगहम, दि. 02 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. आज न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र 10 षटके पूर्ण होण्याआधीच खेळ पावसामुळे खेळ थांबवावा लागलाय. न्यूझीलंडने 9.3 षटके खेळताना एक गडी गमावत 67 धावा केल्या. दरम्यान, पाऊस थांबला असून लवकरच खेळ सुरु होईल.