Breaking News

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडली

लखनऊ, दि. 02 - उत्तर प्रदेशमधील पीलीभीतमधून खासदार आणि केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
मनेका गांधी यांना श्‍वास घेतांना त्रास होत होता. त्यांना दिल्लीला आणलं जात आहे. मेनका गांधी दो दिवसांपासून पीलीभीतमध्ये आहेत. त्यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली आणि विकास कामांचा देखील आढावा घेतला. त्यांनी तेथे एका अभियांनाटं उदघाटन देखील केलं. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.