Breaking News

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत रविवारी गर्भसंस्कार, पालकत्व शिबीराचे आयोजन

अकोले, दि. 30 - श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुकुल पिठामार्फत नव्या पिढीवर संस्कार रुजविण्या करीता ‘गर्भसंस्कार व पालकत्व’ शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वामीसमर्थ केंद्राचे प्रतिनिधी संजय हुजबंद यांनी दिली.
या शिबीराचे रविवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संकल्प मंगल कार्यालय, पिव्हीपी कॉलेज समोर लोणी खुर्द येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुकुल पिठामार्फत नव्या पिढीवर संस्कार रुजलेले असावेत, यासाठी प्रथम आईच्या गर्भावरच संस्कार केले तर भविष्यात आदर्श मानव घडविणे सहज सोपे होर्ईल व याद्वारा सुयोग्य, सशक्त, नितीवान पिढी निर्माण होईल. राष्ट्रीय निर्मीतीसाठी सक्रीय ठरणार आहे.
श्री. हुजबंद पुढे म्हणाले की, आजच्या बदललेल्या परिस्थितीत मुल्यांची र्‍हास होत असून योग्य जीवन आदर्शाचा आभाव बदलेले कौटुंबीक व सामाजिक परिस्थिती, वडीलधारी व्यक्तींचा व गुरुजनांविषयीचा कमी होत असलेला आदर अशा अनेक प्रश्‍नांवर विचार करण्याची वेळ आलेली आहे.
गेल्या काही दशकांपासून श्री. स्वामी समर्थ सेवा मार्ग देश विदेशात सुमारे पाच हजार केंद्राच्या माध्यमातून नितीमुल्यांवर आधारीत मार्गदर्शन करीत आहे. भावी पिढी स्थिर बुध्दीची, नितीमुल्य संस्कारीत, ताणतणाव सहन करणारी सामाजिक बांधीलकीची व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव असणारी अशी सर्वांगीण व्यक्तीमत्वाचा विकास असणारी असावी. या हेतूने या शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीरासाठी अनेक तज्ञ डॉक्टर, सेवा मार्गातील विवाह संस्कार विभागाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. सर्व महिला व पालकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे  आवाहन  स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.