Breaking News

अमेरिकेच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलणार - डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन, दि. 06 - लंडनमध्ये झालेल्या दहशतवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती योग्य पावले उचलण्यात येतील  असे सांगितले. तसेच लंडनमधील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात अमेरिकेची जनता सहभागी आहे, असेही ते म्हणाले. या हल्ल्यात सात  जण ठार तर 48 जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रम्प यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष असल्याच्या नात्याने देशावर येणारे प्रत्येक संकटावर मात करणे माझे कर्तव्य असून देशातील जनता, समुदाय यांच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय  घेऊन त्या दिशेने वाटचाल करेन. आता हे हल्ले थांबविलेच पाहिजेत असे त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले.