दहशतवादी कारवाया बंद होईपर्यंत पाकशी चर्चा नाही : स्वराज
नवी दिल्ली, दि. 06 - भारत आणि पाकिस्तान या उभय देशांमधील प्रश्न चर्चेने सोडवण्यास भारत तयार आहे. मात्र एकीकडे चर्चा करत असताना दुसरीकडे पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या तर तोडगा निघणे शक्य नाही. कारण दहशतवादी कारवाया सहन करणे आणि चर्चा करणे या दोन्ही गोष्टी एकत्र होणे शक्य नाही, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला ठणकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
काश्मीरवर चर्चेने मार्ग काढता येऊ शकतो. कारण पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा जागतिक न्यायालयात घेऊन जाऊ शकत नाही, असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
चीनशी हवाई हद्दीसंदर्भात सुरू असलेल्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. चीनशी विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली जाणार आहे. त्यावेळी हा मुद्दा नक्की चर्चिला जाईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, भारत-अमेरिका यांच्यातील संबंध अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावेळी चांगले होते. ते संबंध डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर अधिक दृढ होत असल्याचेही सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.