डेंग्यू, चिकनगुनियावर नियंत्रण मिळवण्यासाठी अभियान राबवा - दिल्ली उच्च न्यायालय
नवी दिल्ली, दि. 01 - डेंग्यू आणि चिकनगुनियांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छ भारतसारखे अभियान राबवले पाहिजे,असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले. प्रभारी मुख्य न्या. गीता मित्तल आणि न्या. सी. हरि शंकर यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला हा सल्ला दिला आहे.
केंद्र सरकारमार्फत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियान देशभरात चांगल्या पद्धतीने राबवले जात आहे. या आधारे दिल्ली सरकारनेही डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अभियान चालवले पाहिजे. नभोवाणी, दूरदर्शन, फलक किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान देशभरात पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा चांगला प्रयत्न आहे. दिल्ली सरकारने या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती केली नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, या आजारांच्या नियंत्रणासाठी उपाय योजले जात असून जाहिराती दिल्या असल्याचे न्यायालयासमोर उपस्थित झालेल्या वकिलांनी सांगितले.