बाटलीबंद पाण्याची विक्री वाढवण्यासाठी रेल्वेची 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
नवी दिल्ली, दि. 01 - उत्पादन वाढविण्यासाठी आगामी 3 वर्षामध्ये आमच्या योजनेअंतर्गत 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. सध्या ’रेल नीर’ ची विक्री केवळ रेल्वे स्थानकांवर करण्यात येते. यापैकी रेल्वेला मागणीच्या केवळ 20 टक्के पुरवठा करते. यामुळेच रेल्वेच्या नव्या योजनेमध्ये उत्पादनास चालना देण्यासाठी वर्षाला 100 कोटी पाण्याच्या बाटल्या तयार करण्यात येणार आहेत. ’रेल नीर’ चे सहा प्रकल्प असून ते दानापुर (बिहार), नांगलोई (दिल्ली), पालूर (तमिळनाडू), अंबरनाथ (महाराष्ट्र), अमेठी (उत्तर प्रदेश) आणि पारास्सला (केरल) येथे आहेत.