यंदाचा सर्वोकृष्ट फूटबॉलपटू मेस्सीच : डिव्हिलियर्स
लंडन, दि. 01 - बॅलेन ड ओर पुरस्कारासाठी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी यालाच माझी पसंती असेल, असे मत द. आफ्रिकेचा कर्णधार अब्रहाम डिव्हिलियर्स याने व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अधिकृत ट्विटर खात्याच्या माध्यमातून डिव्हिलियर्सने चाहत्यांशी थेट प्रक्षेपणातून संवाद साधला. त्यावेळी एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला डिव्हिलियर्सने उत्तर दिले.
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टीयानो रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातून जर निवड करायची असेल, तर माझी नेहमीच मेस्सीला पसंती असेल. मेस्सी हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. तो कधीही कोणतीही परिस्थिती अतिरंजित करत नाही. साध्या व शांत पद्धतीने मैदानावर वावरतो. तसेच, खूप सामन्यात त्याने संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढून विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे माझ्यासाठी यंदाचा सर्वोकृष्ट फूटबॉलपटू मेस्सीच, असे डिव्हिलियर्सने स्पष्टपणे सांगितले.