Breaking News

शिर्डीत शिवाश्रमा व्हावे यासाठी प्रयत्नशील - शिवशाहीर तनपुरे

अकोले, दि. 24 - शिवचरित्र वाचल्याने व शिवायण ऐकल्याने मनुष्याचेच नव्हे तर राष्ट्राचेही चरित्र घडते. ही बाब लक्षात घेवून शिर्डी विमानतळाजवळ शिवाश्रम व्हावा असा आपण संकल्प सोडला आहे. यासाठी 10 कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे. तो शिवाश्रम झाल्याशिवाय पायात पायताण घालणार नाही, असा आपण संकल्प सोडला आहे, अशी माहिती शिवशाहीर विजय तनपुरे यांनी दिली.
श्री. तनपुरे येथील अभिनव शिक्षण संस्थेत व्याख्यानाला आले ते होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या शिवाश्रमाबद्धल माहिती दिली. यातून नेमके काय साधले जाणार आहे याबाबत माहिती दिली. 45 देशात भ्रमंती करून राजा शिवाजी रयतेचा राजा कसा होता.आणि त्या राजाने केलेली ऐतिहासिक कामगिरी जगभर सांगत फिरत आहे. अभिनव शिक्षण संस्थेचे अद्यक्ष मधुकरराव नवले, खजीनदार भाऊसाहेब नाईकवाडी, प्राचार्य अनिल बेंद्रे, प्रा. इंद्रभान कोल्हाळ, प्रा. सचिन उगले, बाळासाहेब तनपुरे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
शिवाश्रमाची माहिती देतांना ते म्हणाले या आश्रमात अनाथ, वृद्ध कलावंत कलाकार, बेवारस आई वडील राहतील. शिवाय 200 उद्योग चालवू शकतील. त्यातून ते कमावतील व जगतील अशी त्यामागची प्रेरणा आहे. शिवाय यासाठी सर्व समाज घटकांचा सहभाग राहील. यासाठी शिवायण (श्री शिवाजी राजांच्या चरित्राचे संगीत सादरीकरण) सादरीकरणाचे व अन्य व्याख्यानांचे मानधन व परदेश दौर्‍यातील व्याख्यानांचे मानधन खर्ची पडेल. प्रत्येकाने एक रुपया दुसर्‍याला दिला तर त्याचे दोन रुपये होतील अथवा अधिक होतील. पण विचार दिला तर मोठे काम उभे राहील असे सांगून ते म्हणाले, शिवाजी राजे हे मुसलमानांच्या नव्हे तर स्वराज्याच्या आड येणारांच्या विरोधात होते.छत्रपती शिवाजी राजे हे नीतीमंत राजे होते. जेथे कर्म असते, तेथेच नीती असते. नीती असते तेथेच लक्ष्मी असते. मात्र त्याला जोडून अवदसा येते त्याची दखल प्रत्येकाने घेतली तरच आपण शिवाजी राजांचे विचार आत्मसात करू शकतो अशी पुस्ती जोडली.
स्वतःसाठी मागितलेली मदत ही भीक ठरते. कुटुंबासाठी मागितलेली मदत ही भिक्षा ठरते. समाजासाठी मागितलेली मदत हे दान ठरते.तर विश्वासाठी मागितलेली मदत हे पसायदान ठरते अशी मदतीची सरळसोपी व्याख्या सांगून श्री. तनपुरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 49 वी भेट ही शेवटची ठरली. आपण अपंग असलो, तरीही मनाने अपंग नाही हे सांगण्यासाठीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही शाहिरी करणे पसंत केले आहे. तर मुलीला आएएस परीक्षा उत्तीर्ण व्हावयाचे आहे. यासाठी तिचे स्वप्न पूर्ण करणे याला प्राधान्य दिले आहे. शिवाय दिल्ली येथील विद्यापीठाने मानद डी. लिट जाहीर केली आहे, प्रा. कोल्हाळ यांनी शेवटी आभार मानले.