Breaking News

नारायणगाव मुस्लिम समाजाने जोपासली आदर्श परंपरा :आ.सोनवणे

अकोले, दि. 24 - नारायणगाव येथील मुस्लिम समाजाने सातत्याने सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी सातत्याने उपक्रम घेतले आहे. समाजाने प्रत्येक वर्षी घेत असलेल्या इफ्तार कार्यक्रमात  सर्वधर्मीय, सर्वपक्षीय लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहिल्याने मोठे समाधान मिळते असे मनोगत जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले.
नारायणगाव पोलिस ठाणे  आणि सुन्नी मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी जुन्नर तालुक्याचे तहसिलदार किरण काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री देसाई, जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, युवा नेते अमित बेनके, जि. प. सदस्य गुलाब पारखे, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष नामदेव खैरे, मुख्य संयोजक सहाय्यक पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस निरीक्षक कैलास घोडके , सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र थोरात, मारुती खेडकर, उपसरपंच संतोष पाटे, संतोषनाना खैरे, जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे, भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक काझी, आशिष माळवदकर, संतोष वाजगे, योगेश पाटे, विश्वस्त रशीद इनामदार, आरीफ आतार, एजाज आतार, हाजीनुर मोहम्मद मणियार, मेहबूब काझी, जलील अन्सारी, फरीद कुरेशी, समीर इनामदार, एजाज चौधरी, हमीद शेख इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आशाताई बुचके यांनी विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्य संयोजक टी. वाय. मुजावर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आरीफ आतार, रशीद इनामदार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मेहबूब काझी यांनी केले.