Breaking News

समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी

अहमदनगर, दि. 30 - समाजाच्या ऋणातून उतराई होण्याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. गरजूंना मदतीचा हात देणे हे सर्वांचे कर्तव्य असून, श्रमिक कामगारांची मुले शिक्षण घेत असलेल्या मार्कंडेय शाळेत गरजू विद्यार्थ्यांना स्माईल ग्रुपच्या युवकांनी केलेला मदतीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद क्यादर यांनी केले.
गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्माईल ग्रुपच्या वतीने शालेय युनिफॉर्म व इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तक संचचे वाटप करण्यात आले. यावेळी क्यादर बोलत होते. याप्रसंगी विलास पेद्राम, स्माईल ग्रुपचे सारंग मुळे, निमीश मेढेकर, सुमित मुळे, अमोल अडसुळ, शिरीष बिमन, विकास मुत्याल, अभिजीत नक्का, स्वप्निल गोरे, दिनेश शिंदे, विशाल म्याना, अमित कुंभार, पराग पारीख, महेश खोजे, मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे, उपमुख्यध्यापक पांडुरंग गोने, पर्यवेक्षक दिपक रामदीन, पर्यवेक्षिका सौ. सरोजनी रच्चा, सहकारी शिक्षिका रेणुका श्रीगादी, रेखा बुरा, रेणुका खरदास, निलेश आनंदास आदिंसह शिक्षक, विद्यार्थी व स्माईल ग्रुपच्या युवकांचे पालक उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय युनिफॉर्म व क्रमिक पाठ्यपुस्तक संचचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे यांनी केले. 13 युवक मित्रांनी स्माईल ग्रुपची मुहर्तमेढ दोन वर्षापुर्वी रोवली असून, त्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. नगरमधील सर्वसामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित युवकांचा ग्रुप असलेले अनेकजण पुण्याला उच्च पदस्थ नोकरीवर आहेत तर काही स्वत:चा व्यवसाय करत आहे.