Breaking News

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी नगरच्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 30 - सोशल मिडीयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पैगंबर मोहम्मद( स. अ) च्या बाबतीत अवमान व बदनामी करणारा मेसेज टाकल्याने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या या प्रकरणी नगर येथील मजकूर पाठवीणार्या युवका   विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गून्हा दाखल करण्यात आला आहे.या वेळी मोठा जमाव पोलीस स्टेशनला जमा झाला होता. 
शहरातील व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या नदीम बाबामिया सय्यद वय 28 रा जामखेड यांच्या मोबाईल वरील गावाकडची सनी लियोन या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मो नंबर (9850541989) या आरोपी अतुल गांगर्डे रा.नगर याच्या नंबर वरून  प्रेषित मुहम्मद( स. अ.) यांच्या बाबत अश्‍लील व अवमानकारक मचकूर टाकण्यात आला.या मजकुराने मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे मुस्लिम समाजाच्या लोकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जाऊन सबंधितावर गून्हा दाखल करण्यास भाग पाडले.तसेच मोठा जमाव देखील पोलीस स्टेशनच्या बाहेर जमला होता. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे जामखेड येथे आले व त्यांच्या आदेशावरून जामखेड पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी रात्री गून्हा दाखल केला.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी संबंधितांवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगत सर्वांना शांतता राखून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.शहरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी मुस्लिम समाजाने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तरी  संयम ठेवून शांतता राखण्याचे अव्हान पोलिसांनी केले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे हे करत करत आहेत.सध्या शहरात शांततेचे वातावरण आहे.