Breaking News

26 लाखाच्या हवाला नोटा प्रकरणी ; दोघे ताब्यात

अहमदनगर, दि. 30 - लाखो रुपयांचा हवाला रक्कम दोघेजण घेऊन जाणार असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांना मिळाली. ही माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक अभय परमार यांना कळविली. परमार यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर परिसरात रात्री सापळा रचला. दोघेजण खाकी रंगाची पैशाची बॅक घेऊन जात असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवित विचारले कोठे चालला आहे, अशी विचारणा होताच त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पिशवित काय आहे अशी विचारणा करताच दोघांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यातील एकाला पकडत असताना एका पोलीस कर्मचार्‍याच्या बोटाला जखम झाली. तरीही त्या पोलिसाने हवाला संशयिताला सोडले नाही, मुद्देमालासह दोघे पोलिसांनी ताब्यात घेतले.