Breaking News

शरद पवारही समृद्धी महामार्गाच्या विरोधात

औरंगाबाद, दि. 09 - राज्याच्या विकासाठी महत्वाच्या ठरणार्या समृद्धी महामार्गाच्या विरोधातील आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारही उतरले आहेत.  समृद्धी महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या शेतकरी परिषदेत 12 जून रोजी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.सदर माहिती माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, भाकपचे डॉ. भालचंद्र कानगो, प्रा.राम बाहेती आदींनी संयुक्त  पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनाचा विषय राज्यभर गाजत आहे. ठिकठिकाणी शेतकर्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे, असे  असूनही सरकारकडून प्रकल्पाचे समर्थन सुरू आहे.
शेतक-यांची संमती घेण्याआधीच पुढचे प्लॅन जाहीर केले जात आहेत. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. पोलिस बळाचा वापर केला जात असल्याचे आमदार  चव्हाण यांनी सांगितलेसमृद्धी महामार्ग विरोधी लढ्याचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, अशी विनंती शेतकर्यांनी केली. त्या अनुषंगाने 12 जून रोजी सिडकोतील संत  तुकाराम नाट्यगृहात शेतकरी परिषद आयोजित केली आहे. यासाठी दहा जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी होतील, असे आमदार चिकटगावकर यांनी सांगितले.