महिला तक्रार निवारण समितीच्या प्रशिक्षणामुळे त्यांच्या कामाला दिशा मिळेल - विजया रहाटकर
औरंगाबाद, दि. 09 - कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या आजच्या कार्यशाळेमुळे समिती सक्षम होवून तिच्या कामाला दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील विभागीय आयुक्त कार्यालय आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नाट्यगृहात आयेाजित मराठवाडास्तरावरील कार्यशाळेच्या उद्घाटन संमारभात रहाटकर बोलत होत्या. व्यासपीठावर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, औरंगाबाद विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, नांदेड विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व पुरुषांना समान हक्क देणारा हा कायदा आहे. समाजात जेव्हा भान राहात नाही, तेव्हा मात्र हा कायदा उपयोगी पडतो. कोणत्याही आस्थापनांच्या ठिकाणी कामावर असलेल्या महिलांना जेव्हा त्रास होतो. तेव्हा तिला कोठे जावे हे कळत नाही, तेव्हा हा कायदा उपयोगी होतो. असे सांगून रहाटकर म्हणाल्या की, कायद्याला चौकट आहे. कोणी काय करावे हे स्पष्ट सांगितले आहे. तक्रार निवारण समितीला न्यायिक अधिकार प्राप्त झाले आहेत. आजची कार्यशाळा ही ऐतिहासिक कामगिरी आहे.
प्रारंभी रहाटकर यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. ‘सक्षमा’ या माहिती पुस्तिकेचे व चार भिंतीपत्रकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर विशाल केडीया, डॉ. अर्चना गोंधळेकर,मंगला खिवंसरा, डॉ. मोनाली देशपांडे, स्मिता अवचार, रश्मी बोरीकर यांनी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम 2013 या कायद्याची तपशिलवार माहिती सांगितली. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी महेंद्र हरपाळकर, प्रल्हाद कचरे, सरिता सूत्रावे, मंजूषा मुथा, शशिकांत हदगल, विजय राऊत, रमेश मुंडलोड, सुवर्णा पवार, रिता मेत्रेवार, महिला बाल कल्याण उपसंचालक लोंढे आदींनी परिश्रम घेतले. संचालन निता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.