Breaking News

मुख्यसभेला सर्व अधिकारी उपस्थित राहतील - आदेश मुक्ता टिळक

पुणे, दि. 28 - महापालिकेच्या होणार्‍या मुख्यसभेला काही विभागाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भत सूचना देऊन  देखील आज झालेल्या मुख्यसभेला काही अधिकारी उपस्थीत नव्हते, याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना कडक शब्दांत आदेश देत  पुढील मुख्यसभेला सर्व अधिकारी उपस्थित राहतील यांची जबादारी आयुक्तांनी घ्यावी असा आदेश मुक्ता टिळक यांनी दिला. 
शहराच्या संदर्भतील महत्वपूर्ण निर्णय स्थयी समिती आणि मुख्यसभेत घेण्यात येतात, शहरातील प्रश्‍नांवर या बैठकीत चर्चा करण्यात येते मात्र या बैठकींना विभागाचे  अधिकारी गैरहजर असतात अशी तक्रार वारंवार सभासदांकडून करण्यात येत आहे.अधिकारी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे  आदेश देखील अतिरिक्त आयुक्तांनी काढले आहेत असे असून देखील आज अधिकारी मुख्यसभेला उपस्थित नव्हते याबाबत महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व  अधिकारी उपस्थित राहतील यांची काळजी घेण्याची आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे प्रशासन आणि महापौर यांच्यात तेड निर्माण होण्याची शक्यता निर्माण  झाले.