Breaking News

विनोद तावडे यांच्या विरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

औरंगाबाद, दि. 30 - उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बुधवारी रस्त्यावर उतरली.  शिक्षणमंत्री विनोद तावडे डॉ. माने यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केली. संघटनेतर्फे  शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2012 मध्ये झालेल्या पदभरतीत  गैरप्रकारकेल्याप्रकरणी संचालक डॉ. माने यांना 6 एप्रिल रोजी निलंबित केल्याची घोषणा तावडे यांनी विधानसभेतकेली. त्यानंतरही त्यांचे निलंबन न झाल्याचा निषेध  करत अभाविपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यातील विविध शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देत बुधवारी औरंगाबादमध्ये  आंदोलन केले. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहसंचालक डॉ. माने यांच्या विरोधात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘विनोद की ‘धनराज’के  साथ जुगलबंदी’, ‘विनोद तावडे हमे पढने दो’, ‘धनराज माने खुर्ची खाली करा’, ‘विनोद तावडे एक काम छोडकर डान्स करो’ अशा आशयाचे फलक हाती घेत  कार्यकर्ते आंदोलनात सहभागीझाले होते. याप्रकरणी शिक्षणमंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली.सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनानंतर  आंदोलकांनी सहसंचालक डॉ. राजेंद्र धामणस्कर यांना निवेदनदिले. यावेळी प्रदेशमंत्री राम सातपुते, महानगर सहमंत्री निखिल आठवले, शिवा देखणे, विवेक पवार,  गजानन वाबळे, योगेश पवार, इश्‍वर अष्टेकर, वैभव थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.