Breaking News

शहीद संदीप जाधव यांच्यावर केळगावमध्ये अंत्यसंस्कार

औरंगाबाद / कोल्हापूर, दि. 24 - पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही जवानांच्या पार्थिवावर आज त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहे.  शहीद जवान संदीप जाधव यांचं पार्थिव काल औरंगाबादमध्ये आणण्यात आलं. रात्री त्यांचं पार्थिव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आता शहीद जाधव  यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी केळगावकडे रवाना झालं होतं. केळगावात शहीद जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरचे  शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावरही आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच शहीद माने यांचं पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येईल. मानवंदना दिल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी गोगवे इथं रवाना होईल.  सकाळी जवळपास 10 वाजता माने यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने नियंत्रण रेषेवर गुरुवारी रात्री  भ्याड हल्ला केला होता. ज्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाले.
औरंगाबादचे रहिवासी असलेले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे रहिवासी असलेले शिपाई श्रावण बाळकू माने हल्ल्यात शहीद झाले. 35 वर्षीय संदीप जाधव  गेली 15 वर्ष लष्कराच्या सेवेत होते, तर 25 वर्षीय माने 4 वर्षांपूर्वीच सेवेत रुजू झाले होते.