Breaking News

पंतप्रधान मोदी अमेरिका दौर्‍यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याबरोबर एच 1 बी व्हिसा मुद्दयावर चर्चा करणार ?

नवी दिल्ली, दि. 21 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौ-यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर एच 1 बी व्हिसा मुद्दयावर चर्चा  करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
मोदी 25 आणि 26 जून रोजी वॉशिंग्टन दौर्‍यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी 26 जून रोजी वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. याचदरम्यान मोदी आणि  ट्रम्प यांच्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यात विशेष करून एच 1 बी व्हिसा मुद्दयावरील चर्चेकडे भारतीयांचे लक्ष असेल. जानेवारीमध्ये अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी मोदी यांना अमेरिका दौर्‍याचे  आमंत्रण दिले होते.