पठाणकोटमधील एअरबेसचे कमांडर निलंबित
नवी दिल्ली, दि. 21 - पठाणकोटमधील एअरबेसचे कमांडर जे.एस.धमून यांना निलंबित करण्यात आले. सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जी करण्यात आल्यामुळे एअरबेसच्या कमांडरला निलंबित करण्यात आल्याचे समजते.
भारतीय हवाई दलाने सखोल चौकशी केल्यानंतर धमून यांना निलंबित केले. सुरक्षेत हलगर्जी करणा-यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यानंतर धमून यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 2 जानेवारी 2016 मध्ये पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरक्षा दलाचे तीन जवानही शहीद झाले होते.