कोविंद यांच्या नावाच्या घोषणेनंतर शत्रुघ्न सिन्हांकडून नाराजी व्यक्त
नवी दिल्ली, दि. 21 - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या नावाच्या घोषणेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांचे नाव राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित न केल्याचा उल्लेख केला शिवाय कोविंद यांना शुभेच्छा ही दिल्या. पक्षाने आणखी योग्य पद्धतीने ही बाब हाताळणे आवश्यक होते असेही ते म्हणाले. भाजपने राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यापूर्वी अन्य सर्व पक्षातील प्रमुखांशी बोलण्यात अधिक वेळ दवडला. लाल कृष्ण अडवाणी हे मित्र, गुरू व खरा नेता असल्याचेही यात म्हटले आहे.
