Breaking News

वैष्णोदेवीच्या मार्गावर हिमकोटी येथे भूस्खलन; एकाचा मृत्यू, 7 जखमी

जम्मू, दि. 01 - वैष्णोदेवीला जाण्याच्या मार्गावर हिमकोटी येथे भूस्खलन होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. तर, सात जण जखमी झाले आहेत. राज्यात दोन  वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
महामार्गावरून माती बाजूला सारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे हे काम करण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. जम्मू  काश्मीरमधील अनेक भागात पावसामुळे पाणी साठले आहे. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा परिणाम वाहतूकीवर  झालेला दिसून येत आहे.