पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणारे ताब्यात
लातूर, दि. 08 - लातूरच्या रिंग रोड परिसरातील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर आज वविध संघटनांनी धुमाकूळ घातला. शेतक-यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करतअनेक संघटनांनी पालकमंत्र्यांच्या घराला टाळे लावण्याचा प्रयत्न केला या अंदोलनातील 41 जणांना अटक करण्यात आली. प्रचंड पोलिस बंदोबस्त असल्यानं पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत पोलिसांनी कार्यकर्त्यांना जाऊच दिले नाही. शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती, शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन तीव्र केले होते.
शेतकरी आंदोलनाच्या घोषित टप्प्यात आज आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या घरांना टाळे ठोकण्याचा कार्यक्रम होता. या नुसार लातूरात विविध संघटना टप्प्याटप्प्याने आल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत गांधी चौकातून हलगी वाजवित पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच केले. वाटेत शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादनही केले. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुढे किसान क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली. या सगळ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अडविलेल्या ठिकाणी बोंबा मारल्या, शेतक-यांचा जयघोष केला, सरकारचा निषेध केला. सोबत आणलेले मडके फोडून टाकले.
आजवर आम्ही गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेऊन चाललो, सरकार योग्य निर्णय घ्यायला तयार नाही, आज आम्ही उघडे आहोत सरकार असेच वागणार असेल तर आम्ही तुमचेही कपडे काढू. सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही असेच लढत राहू. संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकर्यांना पेन्शन आणि दुधाला पन्नास रुपयांचा भाव द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांच्या वतीने सत्तार पटेल यांनी मांडली.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनीही निदर्शने केली. या सर्वांना काही काळ आंदोलन करु देण्यात आले. नंतर व्हॅनमधून पोलिस ठाण्याकडे रवाना करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यात सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, रुपेश शंके, विमल आकनगिरे, विक्रमसिंह जाधव, प्रदीप शेंडगे, हनुमंत ओगले, नरसिंग पाटील, वसंत कंदमुळे, नागनाथ राघू, पांडुरंग पाटील, दत्तू कंदमुळे, यांचा समावेश आहे. विवेकानंद पोलिस चौकी आणि गांधी चौक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया केल्या.