सर्वोदय साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार
सांगली, दि. 08 - राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांच्या गटाने अचानकपणे वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेचे नेते माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाच्याच कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले.
या साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी एकूण 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 21 जून असून याच दिवशी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या साखर कारखान्याच्या मतदार यादीविरोधात जयंत पाटील गटाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याने या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र या गटाच्यावतीने कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
या निवडणुकीत संभाजी पवार गटाकडून 21 पैकी 20 जागांवर 35 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात महिला गटातील दोन जागांसाठी सुजाता पाटील (मौजे डिग्रज) व सुमन चौगुले (कसबे डिग्रज) यांचा, तर इतर मागासवर्गीय गटातून रहिमान मुलाणी (समडोळी) व व्यक्तिगत संस्था गटातून शलाका पवार (सांगली) यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे. या तीनही गटात जितक्या जागा तितकेच अर्ज दाखल झाल्याने त्या गटातील उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत.