डॉ. राधिका वाघ ठरल्या ’मिसेस इंडिया ब्युटीफूल’च्या मानकरी
पुणे, दि. 01 - ए. आर. ग्रुपच्या वतीने मुबंई येथे आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राधिका वाघ यांनी ’मिसेस इंडिया ब्युटीफूल -2017’ चा किताब पटकावला.
राष्ट्रीय पातळीवर झालेल्या या स्पर्धेत विविध राज्यातील 36 स्पर्धेक सहभागी झाल्या होत्या. डॉ. वाघ यांनी या स्पर्धेत यश संपादन करून पुणे शहराचे नाव झळकावले. मला पती आणि मुलांच्या पाठिंब्यामुळेच स्पर्धेत सहभागी होता आले. त्यामुळे या यशाचे सर्व श्रेय पती डॉ. कुलदीप आणि मुलगा राघव यांचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. वाघ या ब्लॉसम महिला केअर सेंटरच्या संचालिका आहेत. त्या 2016 मध्ये घेतलेल्या ’मिसेस महाराष्ट्र’ या किताबच्या देखील मानकरी आहेत. मिसेस महाराष्ट्रचा किताब पटकावल्यावर त्यांनी ’इंडिया ब्युटीफूल’साठी तयारी केली आणि यश संपादन केले.