Breaking News

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून विशेष सेवा

मुंबई, दि. 01 - गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी आणि मुंबईतील चाकरमान्यांसाठी विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.  या गाड्यांच्या आरक्षणाची तिथी नंतर जाहीर केली जाणार आहे.
गाडी क्रमांक 01445 मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते करमाळी गाडी 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान दररोज (एकाच दिशेने) रात्री 12 वाजून 30 मिनिटानी  छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटून त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 30 मिनिटानी करमाळीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल,रोहा, माणगाव, वीर, खेड,  चिपळूण, सावर्डे, अरावली रोड संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली,सिंधुदुर्ग, कुडाळ, झराप, सावंतवाडी रोड,  मडुरे आणि थिवीम या स्थानकांवर थांबेल. गाडी क्रमांक 01446 करमाळी ते पुणे ही गाडी 18 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान दररोज (एकाच दिशेने) दुपारी 3  वाजून 25 मिनिटानी करमाळीहून सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजून 50 मिनिटानी पुण्याला पोहोचले. ही गाडी थिविम, मडुरे, सावंतवाडी रोड, झराप, कुडाळ,  सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडावली, रत्नागिरी,संगमेश्‍वर रोड, अरावली रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल  आणि लोणावळा या स्थानकांवर थांबेल.
गाडी क्रमांक 01447 पुणे ते सावंतवाडी रोड ही गाडी 19 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान दररोज (एकाच दिशेने) सकाळी 8 वाजून 50 मिनिटानी पुण्याहून सुटून  त्याचदिवशी रात्री 8 वाजून 20 मिनिटानी सावंतवाडी रोडला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डे, अरावली रोड,  संगमेश्‍वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगांव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल. गाडी  क्रमांक 01448 सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस ही गाडी 19 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान दररोज (एकाच दिशेने) रात्री 11 वाजता सावंतवाडी  रोडहून सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटानी छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगांव रोड,  वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडवली, रत्नागिरी,संगमेश्‍वर रोड, अरावली रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर या  स्थानकांवर थांबेल. 4 वातानुकूलित तृतीय श्रेणी शयनयान, 5 द्वितीय शयनयान श्रेणी, 8 द्वितीय श्रेणी सामान्या अशी या चारही गाड्यांची संरचना असणार आहे.