Breaking News

नाशिक नगरीत दूसरे महाराष्ट्र व्यापी संगीत महासंमेलन

नाशिक, दि. 02 - नाशिक नगरीत दि.3 ते 5 जून रोजी दूसरे महा व्यापी संगीत महासंमेलन होते आहे. यावेळेस महाराष्ट्रातील संगीत शिक्षक ,अध्यापक , प्राध्यापक  , साधकांचे महाराष्ट्रव्यापी संगीत महासमेलन कर्मवीर अँड.बाबुराव गणपतराव ठाकरे इंजिनिअरिंग कॉलेज सेमीनार हॉल ,उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस , गंगापूर रोड  नाशिक -13 येथे संपन्न होत आहे .सदर सेमीनार हॉलला पं.विष्णू दिगंबर पलुसकर हॉलअसे नाव देण्यात आले आहे .सदर संमेलनाचे उदघाटन ख्यातनाम  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलवादक तालयोगी पं.सुरेश दादा तळवलकर यांचे हस्ते,स्वागताध्यक्ष श्रीमती नीलिमा ताई पवार ,सरचीटनीस म .वी .प्र समाज ,नाशिक यांचे  उपस्थितित दि.3 जून दूपारी 3 वा होणार आहे.
दि .4 जून रोजी दुपारी 4 वा .जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्रि तसेच नाशिकचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमूख उपस्थितित संगीतशिक्षकांचा व  ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान सोहळा सम्पन्न होत आहे .दि .3 व 4 जून रोजी संध्याकाली 6 तो 8.30 व 5 जून रोजी सकाळी 10 ते 1 विशेष संगीतसभा आयोजित  करण्यात आल्या आहे .ज्यात महाराष्ट्रातील निवडक शिक्षक कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहे.
या 3 दिवसीय संमेलनात अभ्यासक्रम नीयोजन ,संगीताचे विद्यार्थ्याच्या जीवनातील स्थान ,शाश्रीय संगीत काल व आज ,संगीत शिक्षक नीउदर्भात आजपर्यंतचे  शासकीय जी.आर 5 वी ते 10 वी संगीत विषय गुरु शिष्य परंपरा आदी विषयावर चर्चा सत्र व मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत असे नाशिक  शाखेचे आयोजक भाऊसाहेब लोखंडे ,.प्रशांत महाबल , दिनकर दांडेकर , तुकाराम ताँबे , दिलीप पागेरे , रामेश्‍वर धोंगडे आश्‍विन पाटील गणेश डोकबाणे आदी  पदाधीकार्यनि कळविले आहे. समारोप दि.5 जून रोजी दु .4 वाजता होणार आहे.