प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कराने मागे-पुढे पाहू नये - राजनाथ सिंग
शिमला, दि. 06 - पाकिस्तानकडून गोळी झाडण्यात आली तर चोख प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कराने मागे-पुढे पाहू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले. हिमाचल प्रदेशमधील हमीरपुर जिल्ह्यात आयोजित त्रिदेव संमेलनात ते बोलत होते.
ते म्हणाले की, पाकिस्तान काश्मीरमध्ये वारंवार हिंसक घटना घडवून आणत आहे. मात्र हे त्यांचे कृत्य आता जास्त काळ चालणार नाही. पाकिस्तानकडून जर गोळी झाडण्यात आली तर भारतीय सैन्यालाही बेछुट गोळीबार करण्याची मुभा असल्याचे राजनाथ सिंग यांनी लष्करातील जवानांना सांगितले.
भ्रष्टाचाराविषयी बोलताना ते म्हणाले की, काँग्रसने त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. मात्र मोदी सरकारला तीन वर्षे झाली असूनही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, असेही त्यांनी नमूद केले.