Breaking News

ओडिशातील नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद, दहा जखमी

भुवनेश्‍वर, दि. 06 - ओडिशामधील कंधमाल जिल्ह्यातील खानमखोल भागातील जंगलात नक्षलवाद्यांनी हल्ला केला असून त्यात एक जवान शहीद झाला आहे.  याशिवाय यात दहा जवान जखमी झाले आहेत. शहिद झालेला जवान लष्करातील विशेष पथकातील असल्याचे समजते. 
शहिद झालेल्या जवानाचे नाव लक्ष्मीकांत जानी असून विशेष पथकातील जवान येथील जंगलातील शोध मोहिम संपवून परतत असताना हा हल्ला करण्यात आला.  त्यांच्यातील चकमक तासभर चालली. या घटनेत नक्षलवादीही ठार झाले असल्याची शक्यता पोलीस महानिरीक्षक अमिताभ ठाकूर यांनी वर्तवली आहे. जखमी  जवानांना बेरहामपूर व फुलबानी परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कंधमालचे पोलीस अधीक्षक पिनाक मिश्रा यांनी दिली आहे.