Breaking News

जोर्वे व पिंपरणे येथे विविध विकास कामांचा आ. थोरात यांच्या हस्ते शुभारंभ

संगमनेर, दि. 05 - सातत्याने विकासकामांतून आघाडीवर असलेल्या संगमनेर तालुक्यात चांगल्या रस्त्यांचे सर्वत्रच जाळे निर्माण झाले आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जोर्वे, रोहम वस्ती ते रणखांबवाडी या 13 किमी अंतराच्या 7 कोटी 51 लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामाचा भुमीपुजन समारंभ आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
पिंपरणे येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे उदघाटन व विविध विकास कामांच्या शुभारंभ तसेच जोर्वे, रोहम वस्ती, पिंपरणे, आंभोरे ते रणखांबवाडी या रस्त्याचे कामाचे उदघाटन आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती सौ. निशा कोकणे, उपसभापती नवनाथ आरगडे, अजय फटांगरे, जि. प. सदस्या शांताबाई खैरे, सुरेश थोरात, बाळासाहेब शिंदे, सदाशिव वाकचौरे, गणपतराव सांगळे, दादाभाऊ देशमुख, आण्णासाहेब राहिंज, सरपंच सुभाष ठोंबरे, सिताराम वर्पे, कु. स्वाती मोरे, शिवाजी जगताप, दिलावर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले संगमनेर तालुका हा क्षेत्रफळाने मोठा असून ही आपले सुसंस्कृत राजकारण, समाजकारण यामुळे विकासात आपली आघाडी कायम आहे. सक्षम सहकार समर्थपणे उभा असून प्रतिकुलतेवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना मोठा आधार देत आहे. तालुक्यात अनेक विकासकामे झाली असून  तालुक्यात रस्त्याचे व प्रवरा नदीवर पुलांचे आपण जाळे निर्माण केले आहे. या रस्त्यावर मोठी वर्दळ असून या कामामुळे वरवंडी, खांबा, दरेवाडी, रणखांब, जांभुळवाडी,  मांडवे, शिंदोडी या गावांतील नागरीकांची मोठी सोय होणार आहे. देवकौठे ते बोटा असा विस्तीर्ण तालुका असून गावोगावी रस्ते, विज, सिंमेट बंधारे, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, हायमास्ट, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसह अनेक विकास कामे आपण केली आहे.
आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, सक्षम व दुरदृष्टी नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे पुर्ण झाली असून पठार भागात अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. अविश्रांत काम ही आमदार थोरात यांच्या कामाची पध्दत व विकास कामे हाच ध्यास ठेवून केलेली कामे यांमुळे ग्रामीण भागाला नवीन झळाळी मिळत आहे.
जोर्वे ते रोहमवस्ती ते रणखांबवाडी या 7 कोटी 51 लाखांच्या 13 किमी रस्त्यांच्या कामाचे शुभारंभ झाल्यामुळे पिंपरणे, आंभोरे , रणखांब, शिंदोडी, खांबा, वरवंडी या गावांमधील नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले आहे.