Breaking News

चॉकलेट विक्रेत्याच्या खात्यात 18 कोटी आढळले, प्राप्तिकर विभागाची नोटीस

विजयवाडा, दि. 05 - एका चॉकलेट विक्रेत्याच्या खात्यात प्राप्तिकर विभागाला तब्बाल 18 कोटी रुपये आढळून आले आहेत. या खात्यातील व्यवहाराचा तपशील  देण्यासाठी विभागाने त्याला समन्स बजावले आहे.
किशोर लाल घरोघरी जाऊन चॉकलेट्स विकतो. त्याची कमाईदेखील तुटपुंजी आहे. त्याच्या कमाईच्या तुलनेत खात्यात जमा झालेली रक्कम आश्‍चर्यचकीत करणारी  आहे. किशोरच्या खात्यावर 18 कोटी 14 लाख 98 हजार 815 रुपये जमा आहेत. किशोरने अलिकडेच विजयवाड्यातील ब्राह्मण मार्गावरील श्री रेणुकामाता  मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या सहकारी बँकेत खाते उघडले होते. ही बँक अहमदाबादची असून विजयवाडा येथे बँकेने अलीकडेच शाखा  उघडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून किशोरच्या खात्यात मुंबईतून या संशयास्पद व्यवहार होत होते. या व्यवहारांविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे  किशोरने प्राप्तिकर खात्याला सांगितले. विभागाने बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे. या व्यवहारात बँकेचा काही हात आहे, याचाही तपास केला जाणार  असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.