केरळमधील भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला
तिरुवनंतपुरम, दि. 09 - केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. सुदैवाने यावेळी कार्यालयात कोणीच नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. दोन हल्लेखोर मोटारसायकलवर आले असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात फक्त कार्यालयातील खुर्ची जळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा हल्ल्यामागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष एस. सुरेश यांनी केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांना नवी दिल्लीत झालेल्या धक्काबुक्कीचा वचपा काढण्यासाठी मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर ब-याच वेळाने पोलीस आले असल्याची आरोपही सुरेश यांनी केला आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे 12 तासांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.