Breaking News

खामगाव-पंढरपूर बससेवा सुरु

बुलडाणा, दि. 21 - खामगाव आगाराचे आगारप्रमुख इंगळे यांनी खामगाव ते जालना ही बस प्रवाशांच्या मागणीनुसार खामगाव-पंढरपूर म्हणून सुरु केल्याने विठ्ठलाचे  दर्शन सुरळीत झाले आहे. खामगाव आगाराची बस खामगाव ते जालना सुरळीत सुरु होती. अधिक उत्पन्न देणारी बस म्हणून नियमित धावत होती. तिच बस 19 जून  पासून खामगाव-साखरखेर्डा मार्गे पंढरपूर म्हणून सकाळी आठ वाजता खामगाव येथून सुटते. तर पावणेदहा वाजता ती साखरखेर्डा येथे येवून शेंदूरजन-मलकापूर  पांग्रा-दुसरबीड-सिंदखेड राजा- नाव्हा-जालना-अंबड-गेवराई बीड-बार्शी मार्गे पंढरपूरला सायंकाळी मुक्कामी पोचते. तर सकाळी साडेपाच वाजता पंढरपूर येथून  त्याच मार्गे परत येते.
ही बस सुरु झाल्याने पंढरपूर येथे जाण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील प्रवाशांना सोयीचे झाले आहे. आज 20 जून रोजी एकादशीच्या मुहूर्तावर सरपंच महेंद्र  पाटील, काटे महाराज, पुरुषोत्तम मानवतकर यांच्याहस्ते बसचे पूजन करुन चालक एन.एन.राखुंडे, वाहक आर.एस.सपकाळ यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
तसेच अनिल खराडे, राजू खराडे, सिताराम कोरडे या वारकर्‍यांचेसुद्धा स्वागत ग्रा.पं.सदस्य जमनाप्रसाद तिवारी, राजू डुकरे, गणेशसिंग राजपूत, दत्ता लष्कर,  नंदकिशोर कोतवाल, सुभाष गवई, दर्शन गवई यांनी केले.