विराट कोहलीच्या कार्यक्रमात विजय मल्ल्याची हजेरी!
लंडन, दि. 06 - भारतातील बँकांना तब्बल नऊ हजार कोटींना चुना लावून पळ काढलेला उद्योजक विजय मल्ल्या लंडनमध्ये बिनधास्त फिरत आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चॅरिटी कार्यक्रमात विजय मल्ल्याने हजेरी लावली. मानवी तस्करी रोखण्यासाठी काम करणार्या जस्टिस अँड केअर या संघटनेतर्फे रविवारी लंडनच्या एसएसी मैदानात विराट कोहलीच्या उपस्थितीत एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात विजय मल्ल्याही उपस्थित होता.
या चॅरिटी कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विजय मल्ल्या काळ्या रंगाच्या गाडीतून उतरुन कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे याआधी एजबस्टनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही स्टेडियममध्ये विजय मल्ल्या हजर होता. मल्ल्या सामना पाहत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता विजय मल्ल्याने विराट कोहलीच्या कार्यक्रमाला जाहीरपणे हजेरी लावल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याने 15 महिन्यांपूर्वी भारत सोडून लंडनला पळ काढला होता. भारताने यंदा 8 फेब्रुवारी रोजी ब्रिटनकडे विजय मल्ल्यांच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. ही याचिका मार्चमध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे पाठवली होती.

Post Comment