Breaking News

‘झरी’च्या प्रिमीयर शोचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 10 - झरी सामाजिक वास्तवाची झळ जो समाज सोसत आहे, त्याला वाचा फोडणारे कथानक असलेल्या चित्रपटाचा प्रिमीयर शो बुलडाण्याच्या  गजानन टॉकीजच्या परद्यावर आज संपन्न झाला. ‘झरी’च्या प्रिमीयरशोचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,  महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन केले. याप्रसंगी विष्णुपंत पाटील, कल्पना मसने, नरेंद्र लांजेवार, पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन  यांची प्रमुख   उपस्थिती होती.पोटाची भूक भागविण्यासाठी परप्रांतीय ठेकेदारांच्या अन्याय अत्याचाराला बळी पडून कुमारी मातांच्या भयानक वास्तवाला वाचा  फोडणार्‍या या चित्रपटाची निर्मिती अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या राधा बिडकर, कुंदन ढाके यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा, संवाद व दिग्दर्शन  राजू मेश्राम यांचे आहे. ‘झरी’ची मुख्य भूमिका नम्रता गायकवाड हिने साकारली असून मिलींद शिंदे, अनिकेत केळकर, कमलेश सावंत, अनंत जोग,नागेश  भोसले,  निशा परुळेकर व तुकाराम बिडकर या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन किशोर हजारे यांनी तर आभार प्रा.  सतीष जमधाडे यांनी मानले.