राजभवन येथे सूर्योदयाच्या साक्षीने राजयोग
मुंबई, दि. 22 - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज राजभवन, मुंबई येथे उगवत्या सूर्याच्या साक्षीने राजभवनाच्या अधिकारी तसेच कर्मचार्यांनी योगासने केली तसेच राजयोग ध्यानधारणा केली. ब्रह्मकुमारी तसेच कैवल्यधाम या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार, परिवार प्रबंधक वसंत साळुंके, एडीसी स्क़्वाड्रन लीडर अजित ढोकणे आणि गौरव सिंग तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. ब्रम्हकुमारी या संस्थेच्या वतीने ब्रम्हकुमारी रुक्मिणीबेन, ब्रम्हकुमारी गीतादीदी, बी के अनुशा तसेच बी. के. बापुलाल यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग ध्यान तसेच योगासने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम या संस्थेचे सचिव सुबोध तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगासने करण्यात आली.