कर्जमाफी फॅशन झाली - व्यंकय्या नायडू
मुंबई, दि. 22 - आताच्या काळात कर्जमाफी फॅशन झाली आहे. हालाखीची परिस्थिती असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी द्यावी, असे वक्तव्य केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज केले आहे. समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. आपल्याला शेतक-यांकडे लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात नायडू बोलत होते. या कार्यक्रमात नायडू यांनी एअर इंडिया आणि स्मार्ट सिटी या मुद्द्यांवरही चर्चा केली.
कर्जमाफी मुद्द्यांवरून देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. अतिशय वाईट परिस्थिती ही मध्य प्रदेशामध्ये आहे. मध्य प्रदेशात कर्जमाफीच्या मागणीवरून अनेक शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. काल पंजाब आणि कर्नाटक राज्यांनी शेतक-यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा केली आहे.