Breaking News

जगभरातील मुस्लिमांनी काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांना समर्थन द्यावे - इराण

तेहरान, दि. 28 - जगभरातील मुस्लिमांनी काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांना समर्थन द्यावे, असे आवाहन इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खमेनी यांनी  केले आहे. 
जगभरातील मुस्लिमांनी बहरीन, येमेन आणि काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांना अत्याचारी हुकुमशहांविरोधात पाठिंबा दिला पाहिजे. तसेच रमजानदरम्यान  नागरिकांवर हल्ले करणा-यांना धडा शिकवला पाहिजे. ईदच्या पार्श्‍वभूमीवर येथील जनतेला खुमेनी संबोधित करत होते. जगभरातील सर्व मुस्लिम नागरिकांना एकत्र  येण्याचे आवाहनही खमेनी यांनी केले. भारत आणि इराणमध्ये चांगले संबंध आहेत. काश्मीर मुद्द्यावरून खमेनी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारत आणि इराण या  दोन्ही देशातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.