Breaking News

पनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी नवाझ शरीफ यांच्या कन्येची होणार चौकशी

इस्लामाबाद, दि. 28 - पनामा पेपर्स गैरव्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीकडून आता नवाझ शरीफ यांची कन्या  मरिअम शरीफ हिचीही चौकशी होणार आहे. 5 जुलैपूर्वी त्यांना चौकशी समितीपुढे हजर राहण्याचे आदेश तिला देण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त ‘डॉन’ या  वृत्तपत्राने दिले आहे. 
यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची चौकशी करण्यात आली होती. अशा प्रकारे चौकशी समितीसमोर हजर होणारे ते पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान  ठरले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पनामा पेपर प्रकरणी 20 एप्रिल रोजी संयुक्त अन्वेषण पथकाची स्थापना केली होती. या पथकाला पंतप्रधान, त्यांचा  मुलगा आणि या प्रकरणाशी निगडीत कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे.