Breaking News

दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत , अमेरिका एकत्र येणार - राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

वॉशिंग्टन, दि. 28 - भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकत्र येऊन इस्लामिक दहशतवाद नष्ट करण्यासाठी कटीबद्ध आहेत अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केली. इस्लामिक दहशतवादामुळे लोकशाहीला मोठा धोका असून हा दहशतवाद नष्ट  करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही ट्रम्प आणि मोदी यांनी केले आहे. मोदी आणि ट्रम्प यांनी दहशतवाद व अन्य मुदद्यांवर चर्चा केली.
अमेरिका आणि भारताने एकत्र येऊन इस्लामिक दहशतवाद नष्ट करण्याचा निर्धार केला आहे. आम्ही दहशतवाद नष्ट करणार. दहशतवादाला आश्रय देणारेही नष्ट करणे  आवश्यक आहे, असे ट्रम्प केले. भारत, अमेरिका आणि जपानचे नौदल संयुक्तपणे सराव करणार असल्याची माहितीही यावेळी ट्रम्प यांनी दिली.
संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले असून मोदी आपले खरे मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठी लोकशाही  असलेल्या राष्ट्राच्या नेत्याचे स्वागत करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे ट्रम्प म्हणाले. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांना सहपरिवार भारतात येण्याचे  निमंत्रण दिले.