Breaking News

डास नियंत्रण व साथीचे आजार नियंत्रण समितीची बैठक संपन्न

अहमदनगर, दि. 30 - अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील डास व त्यामार्फत होणारे डेंग्यू, चिकणुणिया, मलेरिया इत्यादी आजारावंर नियत्रण करणेकामी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली डास नियंत्रण व साथीचे आजार नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. पावसाळ्याचे दिवस डोळ्यासमोर ठेवुन साथीचे आजार व किटकजन्य आजारांवर प्रभाविपणे उपाययोजना राबविणेकरीता 28 जुन ही बैठक पार पडली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त (कर) भालचंद्र बेहरे, डॉ.श्री.चाबुकस्वार, सिव्हील हॉस्पिटलचे डॉ.एस.के.गल्हे, जिल्हा परिषदेचे घुसळे, अति जिल्हा हिवताप अधिकारी राजपूत, शहर अभियंता मनपा वैदयकीय आरोग्य अधिकारी, धोंगडे, एम. डी. काकडे, वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी डॉ.बापु कांडेकर, डॉ.निसार शेख, डॉ.रविंद्र मिरगणे, डॉ.सागर झावरे, डॉ.अविनाश मोरे, डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ.प्रशांत महांडुळे, डॉ.शांतिलाल कटारिया, तसेच सर्व प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आदी सदस्य उपस्थित होते.
याबैठकीत फवारणी, अबेटींग, गप्पी मासे सोडणे, धुरफवारणी, आय.ई.सी, हंगामी फवारणी कर्मचारी, आशा वर्कर पथक, प्रसिध्दी, उपचार, फिरता दवाखाना इत्यादी सर्व बाबींवर चर्चा झाली. मनपामार्फत मागिल 3 महिन्यापासुन करण्यात येत असलेल्या कामाकाजावर सर्व सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रतिबंधकात्मक उपाययोजना प्रभावीपणे होत असल्याने डेंग्यु संशयीत रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य झालेचे व सदरच्या उपाययोजना अधिक प्रभाविपणे राबविणेबाबत सांगोपांग चर्चा होऊन आयुक्त तथा अध्यक्ष यांनी अनेक निर्देश दिले आहेत. यामध्ये रॅपिड टेस्टद्वारे डेंग्यु अजारांचे संशयीत रुग्ण म्हणून निदान होत असल्याने नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरत आहे. रॅपिड टेस्ट ही निश्‍चती डेंग्यूचे निदान करत नसल्याने एलायझा चाचणीव्दारे खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी डेंग्यू आजाराचे निदान करुन घ्यावे, अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे एलायझा चाचणी मोफत होत असल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये डेंग्यू आजाराच्या निश्‍चत निदानासाठी रक्त नमुने पाठवावे, महापालिका हद्दीतील खासगी शाळा, महाविद्यालये इ.नी वर्गामध्ये खिडक्यांना डासरोधक जाळ्या बसवणे, सेप्टीक टॅक, आजुबाजुचा परिसर इ.भागांची साफसफाई ठेवणे, पिण्यासाठी शुध्द पाण्याची व्यवस्था करणे, खेळाच्या मैदानावर पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे याबबात शिक्षण अधिकारी, मनपा यांनी अहवाल करणे, तसेच डासांच्या चाव्या पासून संरक्षण होण्यासाठी साथरोग काळात शालेय विद्यार्थ्यांना पुर्ण बाह्यांचे शर्ट, पॅट, सॉक्स, बुट इत्यादी परिधान करणेबाबत महानगरपालिका शिक्षण अधिकारी यांनी सर्व संस्था चालकांना सुचना द्याव्यात आदिवर चार्चा करण्यात आली.