Breaking News

जामखेड राष्ट्रवादीचे यश वाखाणण्याजोगे - घुले

अहमदनगर, दि. 30 - प्रतिकुल परिस्थितीतही जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करताना जामखेड नगर परिषदेबरोबरच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व सेवा संस्थेची सत्ता  मिळविण्यात आलेले यश वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील हॉटेल मैथली बुधवारी ( दि. 28) येथे झाला.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना घुले बोलत होते. यावेळी नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी,जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, राजेंद्र गुंड , सुरेश भोसले, संजय वराट, बाळासाहेब शिंदे, विकास राळेभात, शरद भोरे, नितीन गोलेकर, विजयसिंह गोलेकर, बिबीशन धनवडे, राजेश वाव्हळ, भाऊराव राळेभात, समीर पठाण, राजेंद्र गोरे, नितीन धांडे, डॉ.सुनील वराट ,बबन तुपेरे , नरेंद्र जाधव, प्रकाश काळे, मयुर डोके, वैजीनाथ पोले, प्रकाश सदाफुले, सुनील कोठारी, हनुमंत पाटील, हरीभाऊ आजबे, प्रशांत राळेभात, इस्माईल तांबोळी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घुले यावेळी म्हणाले, या सरकारने शेतकार्‍यांची फसवणूक केली असून, यामध्ये सरसकट सातबारा कोरा करणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करणे, वृध्द शेतकर्‍यांना पेंन्शन देने  अशा सर्व शेतकर्‍याच्या निगडीत विषयांना बगल दिली आहे. त्यामुळे हे भाजपा - शिवसेनेचे सरकार पिकविणार्‍याचे नसून, खाणार्‍याचे आहे. कर्जमाफीची घोषणा फसवी असून, यातुन नेमके कोणाचे कर्ज माफ होणार याबाबत आजही संभ्रमावस्था आहे. आपली सत्ता असताना, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत - जामखेड मतदार संघासाठी भरीव निधी  दिला होता. त्यामुळे हा मतदार संघात खर्‍या अर्थाने बालेकिल्ला आहे.विरोधात सत्ता असली तरी ,सत्तेच्या विरोधात सर्व सामान्य जनतेसाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येवून काम करावे असे आवाहण घुले यांनी केले.