Breaking News

निर्मलनगर येथे जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षरोपण

अहमदनगर, दि. 29 - सीमेवर देश संरक्षणाचे कर्तव्य पार पाडून, निवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी सामाजिक सेवेसाठी स्थापन केलेल्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने वृक्षरोपण मोहिम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेचा प्रारंभ निर्मलनगर येथे डॉ.बकुल पालवे व सेवानिवृत्त पोलिस उपाधिक्षक यादवराव आव्हाड यांच्या हस्ते वृक्षरोपणाने झाला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, सचिव जगन्नाथ जावळे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सहसचिव निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, शिवाजी गर्जे, संदिप जावळे, धर्मनाथ पालवे, म्हातारदेव पालवे, दिपक पालवे, गीते सर, आव्हाड सर, गीते मेजर, राजेश गर्जे, भाऊसाहेब डमाळे, भगवान पालवे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड.गोरक्ष पालवे, प्रविण पालवे, प्रा.प्रेमकुमार पालवे, मदन पालवे, विठ्ठल गर्जे, रघुनाथ औटी, गणेश पालवे, सोमा शिंदे, श्री कोळपकर, गोकुळ काळे आदिंसह माजी सैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.डॉ. बकुल पालवे म्हणाले की, सैनिकांचे ऋण न फेडता येणारे आहे. माजी सैनिकांनी सामाजिक कार्याचा घेतलेला वसा कौतुकास्पद आहे. आजी-माजी सैनिकांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दवाखान्याची प्रोसेसिंग फी माफ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यादवराव आव्हाड यांनी सैनिक हा देशाचा खरा सन्मान असून, त्यांच्यामुळे आपले कुटुंब सुखरुप आहे. देशसेवा करताना आपल्या कुटुंबापासून दूर राहून ते आपले कर्तव्य बजावत असतात. सैनिकांच्या मागे प्रत्येक भारतीयांनी सक्षमपणे उभे राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिवाजी पालवे म्हणाले की, सैनिक देश सेवा करत असताना, देशहिताच्या भावना त्यांच्या रक्तात भीनलेल्या असतात. भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहे. या प्रतिज्ञेचे पालन सैनिक करत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सैनिकांनी आपल्या पेन्शन मधील काही रक्कम बाजूला काढून जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक  कार्य चालू केले आहे. मागील वर्षी देखील फाऊंडेशनच्या वतीने वृक्षरोपण व संवर्धन  मोहिम  राबविण्यात आली होती.